निंभोरा बु. ग्रामपंचायतीची ग्रामसभा, ग्रामस्थांमध्ये उत्साह, ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला धरले धारेवर.!

निंभोरा बु. प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे )

दि.31/08/21 मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आठवडे बाजार चौकात सकाळी 9:30.वाजता कोरम पुर्ण करुन घेण्यात आली. ग्रामसेवक गणेश पाटील यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचुन दाखविले. ग्रामस्थांच्या समस्येचा महापुर पाढा जोरात बरसला. ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला सदस्यांना चांगले धारेवर धरले.तीन आणि चार वार्डात खारव, बालीश न टाकल्यामुळे ग्रामस्थांनी प्रश्न केला त्यावर तहसिलदाराचे परमिट न भेटत असल्यामुळे दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात आले.गणेश पाटील यांचे म्हणणे असे आहे की कायद्याने बालीश, खारव टाकण्यास परवानगी भेटत नाही मुरुमच टाकण्याची परमीशन भेटते.मग बालीश, खारवाचा अट्टाहास का ? एक नं. वार्डातील गटारी, नाल्याचाही प्रश्न ,अडचणी ग्रामस्थांनी मांडल्यात, सदस्य मनोहर तायडे यांनी प्रस्ताव मंजूर झाले असून लवकरच प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगितले.

सहा नं.वार्डात ही महिला शौचालयाची मागणीने जोर धरला. ठेकेदारी कामाविषयी, तसेच ग्रामपंचायत सदस्य कामात अप्रत्यक्षरित्या भाग घेतात काम स्वत: करतात यावरही जोरदार चर्चा करण्यात आली. दिलीप खैरे, शरद तायडे, यांनी अनेक प्रश्न गावाच्या विकासाच्या दुष्टीने उपस्थित केले.ग्रामपंचायत सदस्य दिलशाद शेख यांनी प्रोसिडींग प्रमाणे विषय घेण्याचे सांगितले परंतु कोणीही मनावर घेतले नाही, अध्यक्ष मिटिंगचे नावाला होते.2020/2021/2022 चा 15 वित्तआयोग कृती आराखडा मंजुरी, आराखडा तयार करणे, वार्षिक अहवाल, अंदाज पत्रकास मंजुरी बाबत प्रश्न घेण्यात आले नाहीत, तसेच समित्या बाबत व्यवस्थित ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले नाही, कृषी समिती, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती स्थापनेबाबत विषय घेण्यात आला नाही. ग्रामदक्षता समितीचेच नावं ग्रामस्थांतून घेण्यात आलीत.

शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी निवड करण्याबाबत विचार विनिमय ग्रामसभेत करण्यात आला नाही. आयत्या वेळेचे विषयच जोर धरू लागले.शरद तायडे सामाजिक कार्यकर्ते यांनी ग्रामसभेत मांडलेले विषय गट क्र. 730.मध्ये प्लॉट गोरगरीब गरजू शेतमजूर, जे लोक गावात भाड्याच्या घरात विस ते पंचवीस वर्षापासून राहतात, ज्यांच्या कडे स्वतः चा प्लॉट, घर नाही. त्यांना देण्यात यावी. तसेच जुन्या पाण्याच्या टाकीच्या वरचा भाग काढून त्याखाली बेरोजगारानां उद्योग धंद्यासाठी गाळे काढण्यात येऊन त्यांना कमी दरात उपलब्ध करून देण्यात यावे.

गट क्र. 14.तहसीलदार रावेर यांच्या 2007 मधील ग्रामपंचायतला दिलेल्या पत्रानुसार सदर ही जागा आठवडे बाजारासाठी देता येत नसून नवीन गावठाण विस्तारासाठी विचाराधीन असुन गावंठाण विस्तारासाठी खुलासा करण्यात यावा.व ठरावात लिहिण्याचे सांगितले.
पाणीपुरवठा योजना पाईप लाईन बाबत ही समस्या मांडतांना ग्रामसेवकाला ग्रामस्थांनी धारेवर धरले.एकंदरीत गोंधळात ग्रामसभा संपन्न झाली.काही ग्रा.पं. सदस्यांनी मध्येच काढता पाय घेतला. ग्रामसभेस सरपंच सचिन महाले, उपसरपंच रंजना ताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य,व ग्रामस्थ, महिला मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त स.पो. नि. स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होता.

_______________________________________________________________________________________________________________________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण निंभोरा बु. परिसरातील बातमी 9922358586 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
प्रमोद कोंडे
निंभोरा बु. प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9922358586

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!