निंभोरा बु. स्टेशन परिसरातील शालेय समितीच्या अध्यक्षपदी दिलीप खैरे यांची निवड.
निंभोरा बु. प्रतिनिधी- ( प्रमोद कोंडे )
निंभोरा बु. ता. रावेर. निंभोरा स्टेशन परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिलीप अमृत खैरे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी सविता विनोद भालेराव यांची तर सदस्य म्हणून रतन सुरेश वाघ, सायराबी बारेला, रुपसिंग बारेला, वैशाली शाम सोनवणे, रेणुका प्रमोद गायकवाड, रुकसार शे. समीर, नरगिस शोएब खाटीक, जावेद सत्तार खाटीक, रविंद्र जोगी, शे. शरीफोद्दीन शे. मोहीयोद्दीन यांची निवड झाली.