निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या लसीकरण कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद.
निंभोरा बु.- प्रमोद कोंडे
रावेर तालुक्यातील निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दि. 14/08/21.शनिवार रोजी मोठया प्रमाणात प्रथमच लसीकरणाचा साठा भेटल्याने निंभोरा गावातून लसीकरण करण्यासाठी मोठया प्रमाणात नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. किरकोळ गोंधळ वगळता लसीकरण कार्यक्रम व्यवस्थित साडे सहा वाजेपर्यंत पार पडला.
300.+100.लस प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध झाल्या होत्या.दुपारी 12:30 पर्यंत 100 लसीकरण डोस झाले होते.संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत 440 चा लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आला. लसीकरण कार्यक्रमा ठिकाणी निंभोरा गावाचे सरपंच सचिन महाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नीलजी उनवणे, पो.नि.योगेश शिंदे, राकेश वराडे, ईश्वर चव्हाण, गणेश सूर्यवंशी, सादिक शेख, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सुनील कोंडे, नितीन पाटील, विजय सोनार, प्रमोद कोंडे, हर्षल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य दिलशाद शेख, व मान्यवर उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चंदन पाटील, कैलास महाजन, रविंद्र महाजन, लसीकरण एस. एच. चौधरी मॅडम आरोग्य सेविका तसेच प्रतिभा ठाकरे आशा स्वयंसेविका, निता कोळंबे, अतुल सर,या सर्वांनी लसीकरण कार्यक्रम यशस्वी केला.