निंभोरा बु. येथे स्मशान भूमीतील लोखंडी शवदाहिनी बसविण्यात यावी… अंत्यविधीसंस्कार साठी अडचण..
मृत्यू शय्येनंतरही प्रेता आत्म्यास यातना:
निंभोरा बु.- प्रमोद कोंडे
निंभोरा बु.. ता.रावेर येथील स्मशान भूमीतील अग्नीदाहासाठी असलेल्या लोखंडी दाहिनी स्मशान भूमीत नसल्याने सरण ( लाकडं ) रचने, शव जाळने जिकिरीचे होत असल्याने ग्रामस्थ त्रयस्थ झाले आहेत. अग्नीदाह दिल्यानंतर सरण कोसळून पडत आहे. त्यामुळे मृत आत्म्यास परत सरण रचून पेटवावे लागत आहे.त्यात लाकडांचा तुटवळा, पाऊसाचे दिवस असल्याने मरणानंतर ही यातना सहन कराव्या लागणे दुर्दैवी आहे. निंभोरा ग्रामपंचायतीने याकडे जातीने लक्ष देऊन पंधरा १५ वित्त आयोगाच्या निधीतून नवी लोखंडी शवदाहिनी बसविण्यात यावी.म्हणजे मृतात्म्याची हेळसांड होणार नाही. व ग्रामस्थांना होणारा त्रास वाचेल.