आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कांडवेल येथे व्यायामशाळेचे भुमिपूजन …. यूवकांच्या भविष्यासाठी घेतली मागणीची दखल
निंभोरा प्रतिनिधी:-(प्रमोद कोंडे)
रावेर तालुक्यातील कांडवेल येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कांडवेल गावातील विजय पाटील, गौतम ठाकरे, व इतर युवक यांनी पाठपुरावा करत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे व्यायामशाळा उभारणीची मागणी केली होती.त्यानुसार मागणीची दखल घेत युवकांच्या भविष्यासाठी मंगळवारी भुमिपूजन कार्यक्रम पार पडला.
स्पर्धा परिक्षेच्या युगात पोलिस भरती, लष्करासह विविध ठिकाणी भरतीसाठी प्रयत्न करणारे युवक दैनंदिन सराव करतात त्यांच्यासाठी गावात व्यायामशाळा असणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे व्यायामशाळेच्या कामाला प्राधान्य दिल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाठिकाणी सांगितले.या भूमिपूजन कार्यक्रमास जेष्ठ शिवसैनिक छोटु पाटील, कांडवेलचे सरपंच आशाबाई सुर्यवंशी , उपसरपंच किशोर कचरे, देविदास वाघ, शेषराव पाटील, धनराज बोरसे, राहुल पाटील, गौतम ठाकरे, विजय पाटील ,कैलास वाघ, ग्रामपंचायत सदस्य विजु पाटील, सुभाष महाजन, भैय्या पाटील, भागवत महाजन, प्रशांत पाटील, उपस्थित होते. विठ्ठल कोळी, शुभम कोळी, यांनी कार्यक्रमाठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला.