सैन्यदलातील जवानांचा सन्मान म्हणून देशसेवेत कार्यरत जवानांची नांवे ग्रामपंचायत कार्यालयात फलकावर लावण्यात यावी
निंभोरा युवासेनेची निवेदन देऊन मागणी.
निंभोरा प्रतिनिधी:-(प्रमोद कोंडे)
निंभोरा येथे 26.जुलै कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला.आपल्या भारत देशाच्या रक्षणासाठी सैन्यात सामील झालेल्या प्रत्येक सैनिक बांधवासाठी हा दिवस गौरववान दिवस असतो. प्रत्येक सैनिक हा आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतो. म्हणून प्रत्येक सैनिकांच्या सन्मानार्थ आपल्या निंभोरा गावातील जे सैनिक बांधव आजी माजी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात सामील झाले आहेत त्यांची नांवे सन्मार्थ ग्रामपंचायत कार्यालयात फलक करून लावावीत जेणेकरून त्यांच्या परिवाराला व गावातील जे तरुण सैन्यात भरती होऊ इच्छिता त्यांना प्रेरणा व अभिमान वाटेल.या सैनिक बांधवांच्या सन्मारार्थ ग्रामपंचायत प्रशासनाला निंभोरा युवासेना तर्फे स्वप्नील भिमराव गिरडे ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसेवक गणेश पाटील यांना निवेदन दिले.
यावेळी निवेदन देतांना माजी पं.स.स.प्रमोद कोंडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील गिरडे, विलास महाले, उन्मेष पाटील, मोहन महाले, मोन्टी तायडे, अजय महाले, आदी उपस्थित होते.