वडगांव निंभोरा फाटा चौफुली रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची, व बुऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर पांढरे पट्टे तयार करण्याची मागणी

निंभोरा – ( प्रमोद कोंडे.mob.- 9922358586. )

वडगांव निंभोरा रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीचा असल्याने वडगांव गावाजवळ बुऱ्हाणपूर ते अंकलेश्वर मेन वाहतुकीचा रस्ता असुन वडगांव फाट्याजवळ रस्त्यांची चौफुली तयार होत असुन हा रस्ता वडगांव गाव जवळ असल्याने व या चौफुली जवळच बस स्टॉप असल्याने फारच घातक ठरत आहे दोनतीन महिन्याआड अपघात होतच असतात.दोनतीन महिने झाले मोटर सायकलीचा त्यानंतर महाराष्ट्र परिवहन बस आणि पोल्ट्री वाहतूक ट्रकचा अपघात झाला होता.
पूर्व पश्चिम बुऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ता, उत्तर दक्षिण वडगांव निंभोरा अशी ही समोरासमोर रस्त्यांची चौफुली आहे. या ठिकाणी वाहने बायपास जात येत असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असुन रस्त्यावर मेन ठिकाणीच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत ते बुजून मेन चौफुलीवर गतिरोधक बसविण्यात यावे व पांढरे पट्टे बुऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर ठराविक अंतरावर दोन्ही बाजूस टाकण्यात यावे अशी मागणी वडगांव रहिवाशी यांची आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!