माझे गावच आहे माझे तिर्थ या भावनेने काम करा ; विकासासाठी राजकारण न करता सोबतच !– जनसंग्राम अध्यक्ष विवेक ठाकरे
निंभोरा प्रतिनिधी:-
रावेर तालुका व पंचक्रोशीतील सर्वात मोठ्या आपल्या गावाच्या सर्वागीन विकासासाठी सोबतच असून जिल्हा परिषद व विविध स्रोतातून विकास योजना आणण्यासाठी सदैव पाठपुरावा करण्यास तयार आहे,याप्रकारे आज सरपंच सचिनभाऊ महाले यांना आश्वस्थ केले.
आमच्या गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री.सचिनभाऊ महाले हे गावाच्या सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर आज आमची पहिलीच भेट झाली त्यातच नुकताच त्यांचा गुरुवारी (१२ ऑगस्ट रोजी) वाढदिवस संपन्न झाला या दोन्हींचा समन्वय साधून श्री.सचिनभाऊ महाले यांचा शाल,श्रीफळ व राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
ग्रामस्वच्छतेचे आद्य प्रवर्तक राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा व थोर राष्ट्रसंत ग्रामगीता रचयिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या शिकवणीनुसार “माझे गावाचं माझे तिर्थ”
याप्रमाणे गावात सर्व मिळून काम करा माझ्यासह गावातील माझे लोक आपल्या सोबतच राहतील असे आश्वासन त्यांना देऊन गावाच्या विकासकामावर सांगोपांग चर्चा केली.
ग्रामपंचायत सदस्य व दलित कवी श्री.मनोहर तायडे,युवा नेते श्री.विशाल तायडे व आमचा जिवाभावाचा सहकारी मित्र शेख नदीम यावेळी उपस्थित होते.