क्लोन ट्रेन योजना

नवी दिल्ली, 30 जुलै 2021

कोविड -19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने 23 मार्च 2020 पासून सर्व नियमित प्रवासी गाड्या स्थगित  केल्या आहेत. सध्या, राज्य सरकारांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि जारी केलेल्या सूचना तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन फक्त विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.

भारतीय रेल्वे या विशेष गाड्यांची उपलब्धता आणि प्रतीक्षा यादीच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि जिथे वाहतुकीची मागणी जास्त आहे अशा मार्गावर “क्लोन ट्रेन” चालवत आहे. 26.07.2021 पासून  22 क्लोन रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत.

रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!