पोस्टाने राख्या पाठविण्यासाठी टपाल विभागाने केली विशेष व्यवस्था
दिल्लीतील 34 महत्त्वाच्या टपाल कार्यालयांमध्ये आणि 2 आरएमएस कार्यालयांत विशेष टपाल काऊंटर उभारण्यात येत आहेत
नवी दिल्ली, 30 जुलै 2021
या वर्षी 22 ऑगस्ट 2021 ला राखीपौर्णिमा आहे. या प्रसंगी पोस्टाने राख्या पाठविण्यासाठी आणि या टपालाच्या सुरळीत वितरणासाठी टपाल विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. टपाल खात्याच्या दिल्ली मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतून इतर राज्यांमध्ये पोस्टाने पाठविल्या जाणाऱ्या राख्यांसाठी 16 ऑगस्ट 2021 पर्यंत आणि दिल्ली मंडळात पाठविल्या जाणाऱ्या राख्यांसाठी 17 ऑगस्ट 2021 पर्यंत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील 34 महत्त्वाच्या टपाल कार्यालयांमध्ये आणि दिल्ली रेल्वे स्थानक आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानक या 2 आरएमएस अर्थात रेल्वे टपाल सेवा कार्यालयांमध्ये विशेष टपाल काऊंटर उभारण्यात येत आहेत.
शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत राख्या पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.