पिएनबी चे ग्राहक असाल तर सावधान! बँकेने जारी केला अलर्ट, दूर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान
नवी दिल्ली प्रतिनिधी
29 जुलै
पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या ग्राहकांना बँकिंग फसवणुकीसंदर्भात एक महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे. बँकेने ग्राहकांना फिशिंग संदर्भात सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. देशभरातील विविध बँका सध्या वाढलेल्या बँकिंग फ्रॉडबाबत अलर्ट करत आहेत. एँघ् सारख्या मोठ्या बँका देखील अशा फसवणुकीबाबत ग-ाहकांना सावध करत असतात. आता झछइ ने ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी अलर्ट पाठवला आहे.
पंजाब नॅशनल बँकेने टवीट करत ग्राहकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. बँकेने असं म्हटलं आहे की, ’सोशल मीडियावरील फेक प्रोफाइलपासून सावध राहा. हँडल व्हेरिफाय केल्याशिवाय कोणतंही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका आणि तुमची वैयक्तिक माहिती कोणसोबत शेअर करू नका.’
याआधी देखील बँकेने अलर्ट जारी करत बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. काही भामटे बँकेचे किंवा आरबीआयचे कर्मचारी असल्याचं सांगून ग-ाहकांना फोन करुन आणि त्यांची वैयक्तिक माहिती मिळवून फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तुम्ही अशा फोन कॉल्सना बळी पडलात तर तुमच्या बँक खात्यातील पैसे लंपास होऊ शकतात.
बँक फ्रॉडपासून वाचण्यासाठी फॉलो करा या टिप्स
-कुणाबरोबरही जढझ, झखछ, उतत, णझख झखछ शेअर करू नका
-फोनमध्ये बँकिंग तपशील सेव्ह करू नका, ही माहिती लीक होण्याची भीती असते
-कुणाशीही एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डाचा तपशील शेअर करू नका
-बँकेच्या अधिकार्यांकडून तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक खात्याचा तपशील विचारला जात नाही हे लक्षात घ्या
-ऑॅनलाइन पेमेंट करताना सावधानता बाळगा
-पडताळणी केल्याशिवाय एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका
-सोअर्स माहित असल्याशिवाय कोणतंही अिि फोनमध्ये डाउनलोड करू नका
-अनोळखी लिंकवर क्लिक करू नका