देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
नवी दिल्ली 29 JUL 2021
विद्यमान शैक्षणिक वर्षात, वैद्यकीय तसेच दंतवैद्यक शाखेतील पदवी आणि पदवीपश्चात अभ्यासक्रमांतील अखिल भारतीय कोटा योजनेच्या प्रवेशप्रक्रियेत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 27% आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 10% आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या मोठ्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
ट्वीट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“आपल्या सरकारने या शैक्षणिक वर्षात, वैद्यकीय तसेच दंतवैद्यक शाखेतील पदवी आणि पदवीपश्चात अभ्यासक्रमांमध्ये अखिल भारतीय कोटा योजनेच्या प्रवेशप्रक्रियेत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 27% आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना 10% आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे आपल्या देशातील हजारों युवकांना दर वर्षी अधिक उत्तम संधी प्राप्त करण्यास आणि त्याद्वारे आपल्या देशात सामाजिक न्यायाचा नवा अध्याय निर्माण करण्यास मदत होईल.”