’शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण’ : संजय राऊत
नवी दिल्ली प्रतिनिधी
28 जुलै
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज भेटणार आहेत. भेटीगाठी व्हायला पाहिजे. त्यातून संवाद होतो चर्चा होते. एक समर्थ विरोधी पर्याय निर्माण होऊ शकतो, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह आहेत. तर ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, ममताजी सोनिया गांधींना भेटणार आहेत. काँग्रेस शिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकत नाही. ममता बॅनजींर्कडे देशातील विरोधी पक्ष आशेनं पाहतोय. समर्थ पर्याय उभा राहू शकतो. ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी भाजपने सत्ता संपत्ती तपास यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. याचं कौतुक पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनाही असेल. ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण ठरल्या आहेत, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह आहेत. विरोधी पक्ष कमजोर झाला तर लोकशाही कमजोर होईल. अनेकदा प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्व केलंय, असंही ते म्हणाले.
पापश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज काँग्रेस च्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाशी केलेल्या चर्चेनंतर ममता बॅनर्जी या संयुक्त पुरोगामी आघाडीतील दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. काल ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग-ेसच्या खासदारांची बैठकही होणार आहे. पेगॅसस प्रकरणावरून काँग-ेसप्रमाणे तृणमूल काँग-ेसनेही दोन्ही सदनांमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे