देशात सलग 11 व्या दिवशी इंधन किंमतींमध्ये कोणतेही संशोधन नाही
नवी दिल्ली प्रतिनिधी
28जुलै
देशातील तेल वितरण कंपन्या (ओएमसी) ने सलग 11 व्या दिवशीही इंधन किंमतींमध्ये कोणतेही संशोधन केले नसून किंमती ह्या स्थिर ठेवल्या आहेत. जो आठवडयातील सर्वांत दिर्घकालावधी आहे. कारण तेल उत्पादनावर जागतीक विकास आणि अमेरिकी इन्वेंट्री वाढल्याने कच्चे तेल आणि उत्पादनाच्या किंमतीमध्ये नरमी आली आहे.
तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किरकोळ मूल्याला कमी करण्या पासून रोखले आहे कारण कोणत्याही घसरणीत संशोधनाच्या आधी तेलाच्या किंमतीमध्ये चढ उताराचा अभ्यास करण्यासाठी अधिक कालावधीची आवश्यकता असते मागील काही दिवसां पासून कच्च्या तेलामध्ये थोडी तेजी आली आहे आणि यामुळे ओएमसीद्वारा किंमतींमध्ये कपातीला रोखले जाऊ शकते आहे.
बुधवारी इंधन किंमतींमध्ये कोणताही बदल न झाल्याने राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. तर डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरच्या अपरिवर्तीत मूल्यावर विकले जात आहे. इंधनाच्या पंप किंमती 18 जुलै पासून स्थिर आहेत. याच्या एक दिवस आधी पेट्रोलमध्ये तीस पैसे प्रति लिटरची वाढ झाली तर डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
इंधनाच्या किंमतींमध्ये वाढीतील रोखी मागील मुख्य कारणांपैकी एक जागतीक तेलाच्या किंमतींमध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण आहे. यामध्ये बेंचमार्क क्रूड 69 डॉलर प्रति बॅरल आहे जो काही आठवडयापूर्वी 77 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक होते. मजबूत मागणींतील अंदाजामुळे हे परत एकदा वाढून 75 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहचले होते.
ओपेकच्या कच्चे तेल उत्पादनाला वाढविण्याच्या एका करारावर पोहचण्या बरोबरच तेलाच्या किंमती नरम राहण्याची आशा आहे हे सर्वांत दिर्घकाळानंतर भारतामध्ये इंधनाच्या किंमतींमध्ये वास्तविक घसरणीचा मार्ग बनू शकतो आहे.
मुंबई शहरामध्ये जेथे पेट्रोलच्य किमती 20 मेला पहिल्यांदा 100 रुपयांच्या वर पोहचल्या आहेत. सध्या पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये आहे जे इतर महानगरांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे.
सर्व महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमती आता 100 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेल्या आहेत. इंधनाच्या किंमतीमध्ये 41 दिवसांच्या वाढी आणि 1 मे पासून 47 दिवसां पर्यंत अरिवर्तीत राहिल्यानंतर आठवडया भर किंमती स्थिर राहिल्या आहेत. 41 दिवसांमधील वाढीने दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये 11.44 रुपये प्रति लिटरची वाढ केली आहे. अशाच प्रकारे दिल्लीमध्ये डिझेलमध्ये 9.14 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे.
एप्रिल 2020 नंतर दिल्लीत पेट्रोलच्या किंमती 69.59 रुपये प्रति लिटरने 32.25 रुपये प्रति लिटरने वाढून आता 101.84 रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. अशा प्रकारे दिल्लीत या कालावधीच्या दरम्यान डिझेलच्या किंमतीमध्ये 27.58 रुपये प्रति लिटरवरुन 62.29 रुपयावरुन वाढून 89.87 रुपये प्रति लीटर झाल्या आहेत.