प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि स्पेस फाउंडेशन कार्यालयाने सुरू केलेल्या खगोलशाळा लघुग्रह शोध मोहीम 2021 अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शोधले लघुग्रह
नवी दिल्ली, 28 जुलै 2021
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय शोध सहकार्याने खगोलशाळा लघुग्रह शोध मोहीम 2021 अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालयाच्या सोळा विद्यार्थ्यांकडून सापडलेल्या आठ लघुग्रहांना “तात्पुरता दर्जा” प्रदान करण्यात आला. खगोलशाळा लघुग्रह शोध मोहीम किंवा केएएससी जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना लघुग्रह शोधण्यासाठी प्रशिक्षण देते. ही मोहीम म्हणजे भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय आणि स्पेस फाउंडेशन यांचा एक उपक्रम आहे.
एक खगोलशाळा. प्रतिमा सौजन्य: स्पेस फाउंडेशन
हार्डीन-सिमन्स विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय खगोलीय शोध सहकार्याने (आयएएससी) अस्थायी शोधांना पुष्टी देण्याची इच्छा प्रदर्शित केली. लघुग्रहांचे दस्तऐवजीकरण होण्यापूर्वी आणि शोधकर्त्याला त्यांचे नामकरण करण्यापूर्वी कित्येक वर्षांचा कालावधी लोटला असेल तरी, यशस्वी शोध आणि आठ लघुग्रहांना तात्पुरता दर्जा प्रदान केला जाणे ही तरुण विद्यार्थ्यांसाठी एक मोठी कामगिरी आहे.
केएएससी 2021 मधील तात्पुरत्या शोधांची यादीः
- 2021 BA11 P11cbE7 B. Dash, S. Singh JNV Anuppur -1 India Provisional 01/16/21 NEH5432
- 2021 AW20 P11bLbH A. Tripathi, B. Dutta JNV Anuppur -2 India Provisional 01/09/21 SBR0052
- 2021 6 P11dgIS I. Shukla JNV Sonebhadra India Provisional 02/12/21 SSI1234
- CA25 P11cCXf S. Singh, A. Sharda Team JNV Una – 1 India Provisional 02/07/21 CVR2802
- 2021 CF30 P11cCXs P. Nandan, H. Sameer Team L. Brothers India Provisional 02/07/21 PRY2021
- 2021 CB18 P11cJ2z A. Kumar, S. Kumar Team Curious Mind India Provisional 02/08/21 AKS9878
- 2021 CY25 P11dhTD S. Kurre, A. Sahu Team Shubhash India Provisional 02/12/21 OOM0000
- 2021 CS23 P11dgJ4 L. Gowda Team Aryabhatta – 7 India Provisional 02/12/21 JNV0010
स्पेस फाउंडेशन विषयी:
विज्ञान विषय लोकप्रिय करण्यासाठी आणि सर्वसामान्यांमध्ये विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक रुची वाढवण्यासाठी 2001 मध्ये स्पेस फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. भारतातील विज्ञान आणि खगोलशास्त्र शिक्षण आणि नवोन्मेष यावरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमधून वैज्ञानिक तयार करण्याचे काम स्पेस करत आहे.
खगोलशाळा लघुग्रह शोध मोहिमेविषयी (केएएससी):
खगोलशाळा लघुग्रह शोध मोहीम (केएएससी) हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संशोधन कार्यक्रमाचा भारत अध्याय आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना लघुग्रह शोध कार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. लघुग्रहांच्या शोध आणि विश्लेषणासाठी उच्च-गुणवत्तेच्या खगोलशास्त्रीय डेटा सेटचे वितरण विद्यार्थ्यांना केले जाते. विद्यार्थी सॉफ्टवेअरचा वापर करून डेटाचे विश्लेषण करतात ज्याचे पर्यवसन संभाव्य शोधात होते. ही निरीक्षणे नासा आणि जेट प्रोपल्शन लॅब (जेपीएल) द्वारे संकलित केल्या जाणाऱ्या नियर -अर्थ ऑब्जेक्ट (एनईओ) डेटामध्ये आहेत. स्पेस इंडियाने आजपर्यंत 20 जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये खगोलशाळा खगोलशास्त्र आणि अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना केली आहे.