वर्ष 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत चांद्रयान -3 अवकाशात सोडले जाण्याची शक्यता आहे – डॉ जितेंद्र सिंह

नवी दिल्ली 28 JUL 2021

केंद्रीय  विज्ञान आणि  तंत्रज्ञान , भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, यापुढे  सामान्य कामकाज गृहीत धरून वर्ष 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत चांद्रयान  -3 अवकाशात सोडले जाण्याची शक्यता आहे . आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  ते म्हणाले की चांद्रयान  -3 चे काम प्रगतीपथावर आहे.

चांद्रयान -3 च्या तयारीमध्ये साधनांच्या मांडणीला अंतिम रूप देणे,  उपप्रणालीची उपलब्धता, एकात्मीकरण , अवकाशयान पातळीची  तपशीलवार चाचणी आणि पृथ्वीवर प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी  विशेष चाचण्यांचा समावेश आहे. कोविड –19 महामारीमुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र  लॉकडाउन काळातही घरून करणे शक्य असलेली सर्व कामे करण्यात आली. अनलॉक कालावधी सुरू झाल्यानंतर चांद्रयान  -3 चे काम पुन्हा वेगाने सुरू झाले आणि ते अंतिम टप्प्यात आले आहे. 

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!