ममता बॅनर्जी आणि कमलनाथमध्ये भेट, देशातील वर्तमान स्थितीवर चर्चा
नवी दिल्ली प्रतिनिधी
27जुलै
केंद्र सरकारच्या विरोधात आणि 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती बनवत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटी घेत आहेत. या क्रमात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग-ेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मंगळवारी दुपारी 2 वाजता ममतांची भेट घेतली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी मंगळवारी दुपारी कॉग-ेसचे नेते कमलनाथ यांची भेट घेतली. ही भेट जवळपास 40 मिनिट चालली. भेटीनंतर ममता बॅनजी कमलनाथ यांना दिल्लीतील तृणमुल काँग-ेस पक्ष कार्यालयाच्या बाहेर पर्यंत सोडण्यासाठी आल्या. भेटीनंतर कमलनाथ यांनी म्हटले की पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी ममतांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. देशातील वर्तमान स्थितीवर ममता बॅनर्जी बरोबर चर्चा झाली. याच बरोबर महागाई सारख्या विषयांवरही चर्चा झाली.
कमलनाथ यांनी म्हटले की ममता बॅनर्जाीं बरोबर माझे जुने नाते असून त्यांच्या बंगालमधील विजयातून देशाला एक संदेश मिळाला आहे. ममता बॅनर्जी सत्या बरोबर उभ्या आहेत.
ममता बॅनर्जी दिल्लीमध्ये काँग-ेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेणार आहेत. मात्र सोनिया गांधी बरोबरील भेटीचा कार्यक्रम अजून निश्चित झालेला नाही.
आपल्या दिल्ली दौर्याच्या आधी ममता बॅनर्जीनी उत्तर भारतामधील आपली उपस्थिती नोंदवली आहे. यासाठी यावेळी 21 जुलैला टिएमसीद्वारा साजरा करण्यात आलेला शहिद दिवसासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. यावेळी प्रथमच ममता बॅनर्जाींचे भाषण अन्य राज्यांमध्येही प्रसारीत करण्यात आले होते. ममतानी हिंदीमध्ये भाषण केले आणि त्यांच्या या भाषणाला दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पक्ष मुख्यालयाच्या बाहेर एलईडी टिव्हीवर ऐकले गेले. तर दिल्लीतील आयोजनामध्ये दुसर्या राजकिय पक्षांच्या नेत्यांनाही बोलावण्यात आले होते. ममतांनी या तयारीला 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीच्या रणगंणाशी जोडून पाहिले जात आहे.
तिसर्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्यानंतर ममता बॅनर्जाींचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. ममता बॅनर्जीनी मंगळवारी दिल्लीत काँग-ेसचे नेते कमलनाथ यांची भेट घेतली. या भेटीत विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.