औषधी वनस्पति संवर्धन आणि विकास क्षेत्रांची सद्यस्थिती
नवी दिल्ली, 27 जुलै 2021
आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील, ‘राष्ट्रीय औषधी वनस्पति मंडळ’ वर्ष 2014-15 पासून औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन, विकास आणि शाश्वत व्यवस्थापन योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत, राष्ट्रीय औषधी वनस्पति मंडळाने देशातील सात राज्यांत, 24 औषधी वनस्पति संवर्धन आणि विकास क्षेत्र विकसित केले जात आहेत. यासाठी 940 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, असे औषधी वनस्पति संवर्धन आणि विकास क्षेत्र तयार करण्यासाठी 635.99 लाख रुपये निधी वितरितही करण्यात आला आहे.
औषधी वनस्पति संवर्धन आणि विकास क्षेत्राची मुख्य जबाबदारी, नैसर्गिक अधिवसांचे जतन करुन, तिथे असलेल्या औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची आहे. एमपीसीडीए चा आणखी एक दीर्घकालीन लाभ म्हणजे यामुळे इथल्या स्थानिक/आदिवासी लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्याची व्यवस्था झाली आहे.
आयुष राज्यमंत्री महेंद्रभाई मंजुपरा यांनी आज ही राज्यसभेत ही माहिती दिली.