ग्राहक आयोगाने मागील तीन वर्षात विवादाची सुमारे 3.20 लाख प्रकरणे निकाली काढली

नवी दिल्ली, 27 जुलै 2021

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री श्री. अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती दिली की, ( CONFONET)कॉन्फोनेट पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात देशभरातील सर्व ग्राहक आयोगांकडून वादविवादाची 3,20,754 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

विद्यमान ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019,मधील तरतुदींनुसार, ग्राहकांच्या विवादांचे सुलभ ,किफायतशीर आणि वेगाने  निराकरण करण्यासाठी, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ग्राहक आयोग या त्रिस्तरीय अर्ध -न्यायिक यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

विविध विषयांसंदर्भातील  ग्राहकांचे  हक्क आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर ‘जागो ग्राहक जागो ‘ या शीर्षकाखाली हा विभाग विविध माध्यमांद्वारे देशव्यापी  “ग्राहक जागरूकता” मोहीम देखील राबवितो

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!