मायगव्ह मंचाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या सुविधेसाठी काम करणारे स्वयंसेवक आणि सहभागी यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

नवी दिल्ली प्रतिनिधी

26 जुलै

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मायगव्ह मंचाला समृध्द करण्यासाठी योगदान देणारे सर्व स्वयंसेवक आणि सहभागी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

मायगव्हइंडियाने पाठवलेल्या टवीट संदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, फसहभागात्मक प्रशासनाचे परिणामकारक उदाहरण म्हणून मायगव्ह ने उल्लेखनीय कामगिरी केली असून आपल्या युवा शक्तीचा आवाज होण्याची भूमिका बजावली आहे.

आज मायगव्ह उपक्रमाला सात वर्षे पूर्ण होत असताना, या मंचाला समृध्द करण्यासाठी योगदान देणारे सर्व स्वयंसेवक आणि सहभागी यांचे मी कौतुक करतो.ङ्ग

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!