किनारी राज्यांमध्ये रोपॅक्स आणि वॉटर टॅक्सी सेवा

नवी दिल्ली  26 JUL 2021

जलवाहतूक ही आर्थिकदृष्ट्या तसेच पर्यावरणास अनुकूल वाहतुकीची पद्धत असल्याने सागरमाला कार्यक्रमांतर्गत बंदर, नौवहन आणि जलवाहतूक मंत्रालयाने अनेक मार्गांवर रो-रो/रो-पॅक्स प्रकल्प हाती घेतले आहेत. सागरमाला कार्यक्रमांतर्गत रो-रो आणि रो-पॅक्स फेरीसाठी पूर्ण केलेल्या आणि प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पानुसार राज्यस्तरीय तपशील खालीलप्रमाणे आहे.

State     Project CompletedUnder ImplementationUnder DevelopmentGrand Total
Maharashtra5132038
Goa1 1314
Andhra Pradesh 189
Tamil Nadu  33
Gujarat1 12
Odisha  22
Karnataka  11
Kerala  11
West Bengal  11
Grand Total7145071

राष्ट्रीय जलमार्गांसाठी (एनडब्ल्यू) तयार केलेल्या तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता आणि तपशीलवार प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) निकालाच्या आधारे, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी 23 राष्ट्रीय जलमार्ग आणि पर्यटन उद्देशाने 2 राष्ट्रीय जलमार्ग व्यवहार्य असल्याचे आढळले आहे. या राष्ट्रीय जलमार्गांचा विकास केल्यास आणि किनारपट्टीच्या मार्गांना ते जोडल्यास देशाच्या आर्थिक विकासास बळकटी मिळेल.

ही माहिती बंदर, नौवहन व जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!