भारतीय तटरक्षक दलाकडून महाराष्ट्र आणि गोव्यातील पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य

नवी दिल्ली, 25 जुलै 2021

भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्र, गोव्यासह कर्नाटक राज्यातील पूरग्रस्त भागात नागरी प्रशासनाला सहकार्य करत मदत आणि बचावकार्य राबवले. महाराष्ट्रातील चिपळूण आणि महाडमध्ये आणि गोव्यातील गांजे धरण, उसगाव आणि कोडली परिसरात हवाई पाहणी केली. तसेच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुमारे 100 किलोची सामग्री पोहचवली.  

रत्नागिरी जिल्ह्यात तटरक्षक दलाने भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाला एनडीआरएफच्या जवानांची ने-आण करण्यासाठी मदत केली.  

25 जुलै 2021 पर्यंत, तटरक्षक दलाने 215 नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!