पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात”मध्ये केलेल्या आवाहनामुळे खादी विक्रीत वाढ
नवी दिल्ली, 25 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीला प्रोत्साहन देण्यासाठी वारंवार केलेल्या आवाहनांमुळे, 2014 पासून देशभरात खादी उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ऑक्टोबर 2016 साली नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस मधील खादी इंडियाच्या प्रमुख दुकानातील एका दिवसातील विक्रीने, एक कोटी रुपयांचा टप्पा 11 वेळा ओलांडला आहे. खादीच्या या विक्रमी कामगिरीचा उल्लेख, रविवारी, दिनांक 25 जुलै रोजी प्रसारित झालेल्या पंतप्रधानांच्या “मन की बात” या कार्यक्रमाच्या भागामध्ये केला गेला.
आर्थिक संकट आणि आजूबाजूला कोरोना महामारीची भीती असूनही खादीच्या या एक दिवसातील विक्रीने ऑक्टोबर – नोव्हेंबर 2020 मध्ये चार वेळा 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री केली, यामुळे ही कामगिरी आणखी महत्त्वपूर्ण ठरते. यापेक्षाही अधिक महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यापूर्वी 2018 मध्ये देखील खादीच्या कॅनॉट प्लेस मधील आउटलेटमध्ये एका दिवसातील विक्रीने 4 वेळा 1 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. 2 ऑक्टोबर 2019 रोजी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) त्यांच्या कॅनॉट प्लेस मधील आउटलेट मधे सर्वाधिक 1.27 कोटी रुपयांच्या एका दिवसात झालेली विक्रीची नोंद केली असून ही आतापर्यंतची विक्रमी विक्रीची नोंद आहे.
पंतप्रधानांनी सतत दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीच्या विक्रीत ही वाढ झाली असल्याचे केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या आवाहनामुळेच मोठ्या संख्येने लोक खासकरून तरुणवर्ग खादी खरेदीकडे वळला आहे. “स्वदेशी” कडे वाढलेल्या या आकर्षणामुळे कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळातही लक्षावधी ग्रामीण उद्योगांची भरभराट झाली आहे.
कोविड-19 महामारीचा सर्व देशभर असलेल्या तीव्र प्रभावाच्या काळातही, 2019-20 मधील 88,887 कोटी रुपयांच्या उलाढालीच्या तुलनेत सन 2020-21 मध्ये 7.71% ची, वाढ होऊन आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 95,741.74 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली गेली आहे.