देशांच्या सीमांवर तैनात असलेल्या निमलष्करी दलांमुळे आपला देश अखंड राहिला आहे, गेल्या दोन वर्षांपासून ही दले पर्यावरण सुधारण्याची जबाबदारीसुद्धा आपल्या खांद्यावर पेलत आहेत : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्‍ली, 25 जुलै 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज चेरापुंजीमध्ये सोहरा येथे हरीत सोहरा वनीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. ग्रेटर सोहरा पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटनसुद्धा शाह यांनी यावेळी केले.

अमित शाह यांनी सदाहरीत इशान्य (एव्हरग्रीन नॉर्थईस्ट) अशी घोषणा देत वनीकरण आणि वृक्षलागवडीचे महत्व ठसवले. पूर्वी चेरापुंजी हे वर्षभर पर्जन्यमान असणारा भाग होता. पण, विकासाच्या नावावर शेतीमधील विषमतेमुळे परिस्थिती बदलली आहे. चेरापुंजीला पुन्हा सहादरीत बनवण्याची मोहीम आज सुरू झाली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. वनीकरणासाठी आसाम रायफल्सने चेरापुंजीचा संपूर्ण भाग दत्तक घेतल्याचे अमित शाह यांनी यावेळी नमूद केले.

आपला देश हा देशांच्या सीमांवर तैनात असलेल्या निमलष्करी दलांमुळे अखंड राहिल्याचे नमूद करत गेल्या दोन वर्षांपासून ही दले पर्यावरण सुधारण्याची जबाबदारीसुद्धा आपल्या खांद्यावर पेलत आहेत असे शाह यांनी सांगितले. या निमलष्करी दलांनी आतापर्यंत 1 कोटी 48 लाख  झाडे लावली, त्यापैकी 1 कोटी 36 लाख झाडे वाढीला लागली आहेत असेही ते म्हणाले. यावर्षीही धोरणाला अनुसरून एक कोटी रोपे विविध ठिकाणी लावण्यात येतील आणि येत्या तीन वर्षात 100 हेक्टर क्षेत्रामध्ये एक कोटी झाडे लावण्याचे उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले.

गृहमंत्री अमित शाह यांनी आज सुरू केलेल्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आज देशभरात झाडे लावत आहे. या मोहिमेंतर्गत आज 16 लाख 31 हजार रोपे लावली जाणार आहेत. 

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!