राजधानीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

नवी दिल्ली दि. २३ : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६५ वी जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी  लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्‍यांनी  यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य टिळक यांना अभिवादन महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली  वाहिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!