देशभरात क्रीडा प्रोत्साहन योजना राबविण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून 23 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आणि 67 प्रशिक्षण केंद्र स्थापन : अनुराग ठाकूर
नवी दिल्ली, 22 जुलै 2021
मुख्य वैशिष्ट्ये:-
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या क्रीडा प्रोत्साहन योजनांसाठी एनसीओई, एसटीसी, विस्तार केंद्रे इत्यादी 189 केंद्रे कार्यरत
या केंद्रांमध्ये एकूण 9025 खेळाडू (5579 मुले आणि 3446 मुली) प्रशिक्षण घेत आहे.
खेलो इंडिया योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरातून 2967 खेलो इंडिया खेळाडूंची निवड (पुरुष : 1494 आणि महिला : 1473)
ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांच्या तयारीसाठी लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजनेमार्फत (टॉप्स) भारताच्या अव्वल खेळाडूंना सहाय्य
सध्या, टॉप्स अंतर्गत 147 वैयक्तिक खेळाडू आणि 2 हॉकी संघ (पुरुष आणि महिला) यांची गाभा समूह म्हणून निवड
‘खेळ’ हा एक राज्याचा विषय असून, युवा खेळाडूंमधील गुणवत्ता ओळखणे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासह खेळाला प्रोत्साहन देण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांवर आहे. तथापि, भारत सरकार क्रीडा प्रोत्साहनासाठी विविध योजना राबवत राज्य सरकार आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाला (एनएसएफ) पूरक प्रयत्न करत आहे.
युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) ही एक स्वायत्त संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून प्रतिभावान खेळाडूंमधील गुणवत्ता ओळखून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्यांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने देशभरात खालील क्रीडा प्रोत्साहन योजना राबवित आहे:
- राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे (एनसीओई)
- भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रशिक्षण केंद्र (एसटीसी)
- भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रशिक्षण केंद्र विस्तार केंद्र
- राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा स्पर्धा (एनएसटीसी)
त्या अनुषंगाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाने देशभरात वरील क्रीडा प्रोत्साहन योजना राबविण्यासाठी 23 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आणि 67 प्रशिक्षण केंद्र स्थापन केली आहेत. .भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वरील खेळ प्रोत्साहन योजनांच्या अंमलबजावणीसाठी एनसीओई, एसटीसी, विस्तार केंद्रे इत्यादींसह एकूण 189 केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये एकूण 9025 खेळाडू (5579 मुले व 3446 मुली) प्रशिक्षण घेत आहेत
लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजना (टॉप्स ) अंतर्गत भारत सरकार ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी भारताच्या अव्वल खेळाडूंना सहाय्य करते. या योजनेंतर्गत मुख्य समूह म्हणून म्हणून 147 वैयक्तिक खेळाडू आणि २ हॉकी संघ (पुरुष आणि महिला) यांची निवड करण्यात आली आहे.
खेलो इंडिया योजनेंतर्गत संपूर्ण देशभरातून सध्या 2967 (पुरुष: 1494 आणि मुली: 1473 ) यांची निवड झाली आहे. जानेवारी, 2021पासून आजपर्यंत टॉप्स, खेलो इंडिया आणि एसएआय योजनांतर्गत निवडलेल्या खेळाडूंचा तपशील खालीलप्रमाणे आहेः
TOPS Athletes | Khelo India Athletes | SAI Schemes Athletes |
54 | 22 | 153 |
युवा व्यवहार व क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.