टोल नाक्यावरील भरणा डिजिटल पद्धतीने घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवरच्या सर्व टोल प्लाझांच्या सर्व मार्गिका या फास्टॅग मार्गिका
नवी दिल्ली, 22 जुलै 2021
केंद्र सरकारने टोल नाक्यावरील भरणा हा डिजिटल पद्धतीने व्हावा या उद्देशाने 15/16 फेब्रुवारी 2021 पासून राष्ट्रीय महामार्गांवरच्या सर्व टोल प्लाझांच्या सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिका म्हणून जाहीर केल्या
सध्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल भरणा केंद्रे सपूंर्णपणे फास्टॅग पद्धतीने सुसज्ज आहेत. 14 फेब्रुवारी 2021 रोजी फास्टॅग भरणा 80 टक्के होता तो 14 जुलै 2021 रोजी 96 टक्के झाला. 14 जुलै 2021 रोजी 3.54 कोटी फास्टॅग देण्यात आले.
रस्ते वापरासाठीचे शुल्क भरणा करण्यासाठीच्या पद्धतीत वा तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा होत असते. नवीन तंत्रज्ञान तसेच नव्या पद्धतींचा अवलंब करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात.
मुख्य मोटार वाहन नियम 1989 च्या अंतर्गत वाहनचालक आणि सहचालक यांच्यासाठी एअरबॅग सुविधा अनिवार्य केली आहे.
लोकसभेत आज केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.