दूरदर्शन आणि आकाशवाणी समवेत ऑलिम्पिक 2020

नवी दिल्ली, 21 जुलै 2021

ऑलिम्पिक 2020 चे मेगा कव्हरेज प्रसारभारतीच्या दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्या नेटवर्कद्वारे अनुभवा आणि समर्पित क्रीडा वाहिनी डीडी स्पोर्ट्स वरही पहा.

ऑलिम्पिक पूर्व ते समारोपापर्यंत करण्यात येणारे हे प्रसारण आमच्या दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि देशभरातल्या डिजिटल मंचावर उपलब्ध राहील.

या मंचावरून प्रसारित होणाऱ्या कव्हरेजचा तपशील याप्रमाणे   –

डीडी स्पोर्ट्स

ऑलिम्पिक विषयक दैनंदिन कार्यक्रम

ऑलिम्पिक मधले विविध क्रीडा प्रकार डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवर सकाळी 5 ते रात्री 7 वाजेपर्यंत दररोज थेट प्रक्षेपित केले जातील. याचे वर तपशील दररोज डीडी स्पोर्ट्स आणि एआयआर स्पोर्ट्स ट्वीटर हॅनडल वर   (@ddsportschannel & @akashvanisports) उपलब्ध करून देण्यात येतील.

डीडी न्यूज

विशेष कार्यक्रम – सोमवार ते शुक्रवार- रात्री 7 वाजता, शनिवार – संध्याकाळी 5 वाजता

ब्रेकफास्ट न्यूज, मिड डे प्राईम आणि न्यूज नाईट मध्ये विशेष भाग

डीडी इंडिया

दररोज रात्री 8.30 वाजता विशेष कार्यक्रम

ब्रेकफास्ट न्यूज, मिड डे प्राईम आणि न्यूज नाईट मध्ये विशेष भाग

आकाशवाणी

टीप : कर्टन  रेझर  आणि दैनंदिन हायलाईट कार्यक्रमाची प्रादेशिक आवृत्ती बिगर हिंदी एआयआर केंद्रांवर, दुसऱ्या  दिवशी त्यांच्या सोयीच्या वेळी शक्यतो, सकाळच्या प्रसारणात प्रसारित केली जाईल. 

* उपांत्यपूर्व आणि कांस्य पदकासाठीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघ असेल तरच एआयआर, या सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन करेल.

टीप : या हॉकी सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन हे लाईव्ह फीड उपलब्ध असल्यासच केले जाईल.

एआयआर, पुरुष दुहेरी कांस्य पदक सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन केवळ भारतीय जोडी या सामन्यांमध्ये असेल तरच प्रसारित करेल.

टीप :  या बॅडमिंटन सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन हे लाईव्ह फीड उपलब्ध असल्यासच केले जाईल.

आकाशवाणीचा  वृत्त सेवा विभाग (एआयआर न्यूज नेटवर्क )

  • एआयआर न्यूज समवेत ऑलिम्पिक प्रश्नमंजुषा :1 जुलै 2021 पासून स्पोर्ट स्कॅन कार्यक्रमात दररोज. देशभरातल्या विजेत्यांना टीम इंडियाची जर्सी मिळणार आहे. साई, एसएआयच्या सहकार्याने हा उपक्रम आहे.
  • एआयआर ऑलिम्पिक विशेष मालिका : डेली स्पोर्ट स्कॅन कार्यक्रम आणि प्राईम टाईम न्यूज वार्तापत्रात भारतीय पथकाच्या खेळाडूंची प्रोफाईल
  • डेली स्पोर्ट स्कॅनमध्ये टोक्यो ऑलिम्पिक आणि भारताच्या पदकाच्या शक्यता यावर विशेष लक्ष केंद्रित
  • सुर्खियोमे चे ब्रांडीग India@Tokyo Olympics म्हणून रात्री 7.40 ते 7.50 या काळात दररोज कार्यक्रम
  • एक्स्ल्यूजीव न्यूज स्टोरी/व्होईस कास्ट   – भारताच्या पदकाच्या शक्यता आणि संघांची तयारी आणि सरकारचे सहाय्य यावर विशेष लक्ष केंद्रित
  • सुर्खियोमे हिंदी मध्ये आणि स्पोर्ट लाईटमध्ये इंग्लिश मध्ये एक्स्ल्यूजीव मुलाखती आणि विशेष चर्चात्मक कार्यक्रम. भारतीय संघातले सदस्य, क्रीडा क्षेत्रातले मान्यवर, प्रशिक्षक यांच्या समवेत भारताची सज्जता, पदकांची शक्यता आणि टोक्यो ऑलिम्पिक मधली भारताची कामगिरी याबाबत चर्चा     
  • चीअर फॉर इंडिया मोहीम –नामांकित खेळाडू, प्रशिक्षक, खेळाडूंचे नातेवाईक, यांचे संदेश एआयआर न्यूज वर आणि 46 प्रादेशिक युनिटवर 77 भाषेत प्रसारित केले जातील याबरोबरच त्यांचे साउंड बाईट  आणि व्हिडीओ संदेश, आणि आमच्या सोशल मिडिया मंचावरच्या  सेल्फी यांचा समावेश असेल.  
  • भारतीय संघाला शुभेच्छा देणारे क्रीडा क्षेत्रातल्या माजी व्यक्तीआणि नागरिक यांचे व्होक्स –पॉप
  • प्रादेशिक  प्रसिद्धी – देशभरातली  राज्ये/केंद्र शासित प्रदेशातली प्रादेशिक न्यूज युनिट न्यूज स्टोरी आणि आपापल्या राज्ये/केंद्र शासित प्रदेशातल्या खेळाडूंची प्रोफाईल प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करतील.
  • आकाशवाणीचे न्यूज नेटवर्कचे सोशल मिडिया मंच, छायाचित्र, व्हिडीओ आणि संबंधित स्टोरी ट्वीट आणि इन्फोग्राफिक्स द्वारे, इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधून पोस्ट करून त्याची व्याप्ती वाढवत आहेत. 

प्रसार भारती न्यूज सर्व्हिस (पीबीएनएस ), दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सोशल मिडिया नेटवर्क, न्यूज वेब साईट, न्यूज ऑन एआयआर ऐप आणि पीबीएनएस टेलिग्राम चनेल (https://t.me/pbns_india) द्वारे  कव्हरेज व्यापक करत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!