पंतप्रधानानी बोलाविलेल्या कोविंड-19 वरील बैठकीवर काँग्रेस,अकाली दलाचा बहिष्कार

नवी दिल्ली प्रतिनिधी

20जुलै

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कोविड-19 च्या प्रकरणात आयोजीत केलेल्या बैठकीत काँग्रेस व अकाली दलाने मंगळवारी सामिल न होण्याचा निर्णय केला आहे.

अकाली दलाने तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील कारणामुळे बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय केला तर काँग-ेसने म्हटले की फक्त काही निवडक नेत्यांना नव्हे तर सर्व खासदारांना माहिती दिली गेली पाहिजे

राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खडगेनी म्हटले की आम्ही सांगितले आहे की सर्व खासदारांना माहिती दिली गेली पाहिजे होती.

या आधी राज्यसभेने कोविडच्या मुद्दावर चर्चा केली व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कोरोना योध्दांद्वारा केलेल्या कार्याची प्रशंसा केली परंतु कुप्रबंधना बाबत बोलताना सरकारवर हल्ला केला. खडगेनी कोविडच्या कारणामुळे झालेल्या मृत्यूंवर प्रश्न उपस्थित केले

खडगेनी म्हटले की मृत्यू बाबतचा सरकारचा आंकडा योग्य नाही कारण भारतामध्ये सहा लाखापेक्षा अधिक गाव आहेत आणि जर एका गावात पाच लोकांचा मृत्यू झाला असेल तर 31 लाखापेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत तसेच शहरी केंद्राना यात सामिल केले तर हा आंकडा 52 लाखा पर्यंत पोहचतो. सरकार चूकीचा डेटा प्रसिध्द करत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!