बिहारमध्ये होतेय सचिन तेंडूलकरचे मंदिर

नवी दिल्ली प्रतिनिधी

17 जुलै

क्रिकेटचा भगवान अशी उपाधी मिळालेल्या भारताच्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरचा जगप्रसिध्द चाहता सुधीरकुमार गौतम याने शुक्रवारी सचिन तेंडूलकरचे मंदिर बांधणार असल्याची घोषणा केली आहे. या मंदिराच्या उद्घाटनाला सचिनला बोलावणार असल्याचे सांगून सुधीरकुमार म्हणाले, माझ्या गावी मुझफ्फरनगर मध्ये मी सचिनचे भव्य मंदिर उभारणार आहे.
सुधीरकुमार म्हणतात, देशात अमिताभ बच्चन, रजनीकांत यांची मंदिरे आहेत मग सचिनचे का नको? सचिन शतकातला सर्वात महान क्रिकेटर आहे. या भव्य मंदिरात सचिनचा संगमरवरी पुतळा बसविला जाणार असून मंदिराची रूपरेखा तयार झाली आहे. सुधीरकुमार बांधकामासाठी पैसे जमविण्याच्या प्रयत्नात आहेत आणि अनेक लोकांनी त्यांना सकारात्मक पाठींबा दिला आहे.
सुधीरकुमार यांच्या म्हणण्यानुसार सचिन सरांनी बिहारच्या भूमीवर पाउल ठेवावे अशी इच्छा असून बिहार मधील क्रिकेटप्रेमी वर्षानुवर्षे त्या क्षणाची प्रतीक्षा करत आहेत. टीम इंडियाचे मनोबल वाढावे अशी इच्छा आहे पण करोना मुळे देशाबाहेर जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले. सचिनचे मंदिर सुधीर जेथे राहतात त्या दामोदरपुरा मोहल्ला मध्ये बांधण्यात येणार आहे. येथील नागरिक म्हणतात, मंदिराचे भूमिपुजन किंवा उद्घाटनाला सचिन आला तर त्याला प्रत्यक्षात पाहण्याचे आमचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!