पेट्रोलचे दर पुन्हा वाढले, डिझेलचे दर स्थीर
नवी दिल्ली प्रतिनिधी
17 जुलै
इंधन च्या दरात सतत चढ-उतार होत आहे. दिल्लीत शनिवारी (दि. 17 जुलै) पुन्हा पेट्रोलचे भडकले आहे. दिलासादायक बाब म्हणजे डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ झाली असून 101.9 रुपये प्रति लिटर इतके पेट्रोलचे दर झाले आहेत तर डिझेलची किंमत 89.93 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.
देशात मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.89 रुपये, कोलकाता मध्ये 102.14 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.55 रुपये प्रति लिटर है. डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ झाली नाही. मुंबईमध्ये डिझेलचे दर 97.51 रुपये, कोलकातामध्ये 93.08 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.44 रुपये प्रति लिटर है.
पेट्रोलच्या किंमती
शहर कालचे दर आजचे दर
दिल्ली 101.6 101.9
मुंबई 107.6 107.89
कोलकाता 101.8 102.14
चेन्नई 102.28 102.55
सीएनजी वाहनांच्या विक्रीत वाढ
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचे सीएनजीकडे अनेक जण वळत आहेत. त्यामुळे सीएनजी वाहनाच्या विक्रीत वाढ झाली आहे. पण, सीएनजीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्लीमध्ये सीएनजीचे दर 44.30 रुपये प्रति किलोग-ॅम इतके झाले आहे.