स्पोर्ट्स फॉर ऑल भारतीय ऑलम्पिक संघाचे अधिकृत पार्टनर बनले

नवी दिल्ली प्रतिनिधी

16 जुलै

भारतीय ऑलम्पिक संघाने (आयओए) आज (शुक्रवार) स्पोर्ट्स फॉर ऑलला (एसएफए) टोकिओ 2020 ऑलम्पिक खेळासाठी भारतीय ऑलम्पिक दलाचे अधिकृत पार्टनरच्या रूपात समाविष्ट केले.

आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले आम्ही आपले अधिकृत स्पोर्ट्स एडटेक पार्टनरच्या रूपात एसएफएला मिळऊन खुप  उत्साहित आहे. आपले तंत्रज्ञान संचलित प्लेटफॉर्म आणि मेगा-स्केलसोबत, शाळा आणि कॉलेज स्तरावर ऑन-ग्राउंड मल्टी-स्पोर्ट स्पर्धेचे आयोजन करेल. तसेच हे आमचे मुले आणि तरूणांना त्यांची सर्वश्रेष्ठ खेळ क्षमतेचा पाठलाग करण्यासाठी सशक्त बनवणे आणि सक्षम करण्याचेही काम करेल, ज्याने भविष्यात भारताचे  ऑलम्पिक स्वप्नाला पूर्ण केले जाऊ शकेल.

वर्ष 2015 मध्ये एसएफएची स्थापना करणारे ॠषिकेश जोशी आणि विश्वास चोकसीने सांगितले, आयओए आणि टीम इंडियासोबत आमचा जुडाव आमच्या या दृढ विश्वासावर कायम आहे की भारताच्या मुलांना त्यांच्या खेळ यात्रेच्या सुरूवातच्या टप्प्यात चांगले खेळ मंच प्रदान करून, आम्ही येणार्‍या वर्षात, भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि जागतिक खेळ मानचित्राचे मुख्यवर नेण्याच्या दिशेत त्याच्या प्रगतीला प्रेरणा देऊ शकते.

एसएफएने एक पूर्णपणे एकीकृत फिजिटल (ऑनलाइन आणि ऑन-ग्राउंडचे काम्बीनेशन) मंच तयार केले आहे जे तंत्रज्ञानाच्या माध्यमाने ऑन-ग्राउंड स्पर्धेसह खेळ शिक्षणाला सक्षम बनवते. हा अनुभव आणि उपकरणाचे योग्य सेटसोबत खेळाच्या 30 स्पर्धेत अ‍ॅथेलीटांची ओळख, पोषण आणि त्यांना सशक्त बनवण्यात मदत करते.

विश्वासाने सांगितले प्रत्येक मुलगा लहान वयात खेळ निवडतो. मग तो मौज-मस्ती करणे, जीवन कौशल शिकणे, फिट राहणे किंवा भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या आकांक्षासाठी असे करत असावे, एसएफए त्यांच्या प्रवासाला सुविधाजनक बनवणे आणि प्रेरित करण्याचे काम करेल. तंत्रज्ञान आमच्या बॅकबोनमध्ये आहे आणि याच्या मदतीने आम्ही मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग आणि ऑन-ग्राउंड स्पर्धेला सर्वांसाठी किफायतशीर आणि सुलभ बनवत आहे.

ॠषिकेश म्हणाले भारतात एक जागतिक खेळ महाशक्ती बनण्याची क्षमता आहे. खेळाला एक करियर पर्याय बनवण्यासाठी आम्हाला एक मजबूत परिस्थितीचे तंत्र बनवण्याची गरज आहे. आमचे मंच प्रशिक्षक आणि अ‍ॅकडमीला त्या मुलांशी जुडण्यात सक्षम बनवेल जो कोणताही खेळ शिकू इच्छितो. हे आमच्या भविष्याच्या चॅम्पियनसाठी एक व्यवस्थित आणि धोरणात्मक पद्धतीने पाया तयार करेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!