नोवाक जोकोविच टोक्यो ऑलिम्पिक मध्ये खेळणार
नवी दिल्ली प्रतिनिधी
16 जुलै
जगातील सर्वोत्कृष्ट टेनिस स्टार नोवाक जोकोविच टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार की नाही? याकडे टेनिस चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. अशातच आता प्रश्नांचे उत्तर स्वत: जोकोविचने दिले आहे. आपण टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये खेळणार असल्याची माहिती गुरुवारी नोवाक जोकोविचने दिली. टोकियो ऑॅलिम्पिक स्पर्धेत प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली आहे. म्हणजेच, यंदा ऑॅलिम्पिक प्रेक्षकांविनाच पार पडणार आहे. तसेच खेळाडूंच्या स्टाफची संख्याही कमी करण्यात आली आहे. यासर्व कारणांमुळे जोकोविचच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. अशातच आता स्वत: जोकोविचने टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
जोकोविचने एक टिवट केले असून या टिवटच्या माध्यमातून आपण टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये खेळणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. जोकोविचने टिवटमध्ये लिहिले आहे की, टोकियो ऑॅलिम्पिकसाठी मी विमानाचे तिकिट बुक केले आहे. टोकियो ऑॅलिम्पिकसाठी टीम सर्बियामध्ये मी गर्वाने सहभागी होणार आहे. जोकोविचने आणखी एक टिवट करत लिहिले की, मोठ्या गर्वाने मी टोकियो ऑॅलिम्पिकसाठी सामना बांधायला घेतले आहे. ऑॅलिम्पिक स्पर्धेच्या सामन्यांमध्ये पदक जिंकण्यासाठी आपल्या राष्ट्रीय संघासोबत भागीदारी करणार आहे. सर्बियासाठी खेळणे माझ्यासाठी नेहमीच आनंददायी आणि प्रेरणादायी ठरले आहे. मी सर्वांना आनंद देण्यासाठी आणि उत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्याला जायला हवे.