गुगलने फ्री यूजर्ससाठी अनलिमिटेड ग्रुप व्हिडीओ कॉल सपोर्टला समाप्त केले

दिल्ली प्रतिनिधी

14जुलै

गुगलने आपल्या व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप मीटवर फ्रि अकाउंटसाठी अनलिमिटेडग्रुपव्हिडीओ कॉलच्या सुविधेला समाप्त केले आहे. यूजर्सला आता ग्रुप कॉलिंगसाठी फक्त एक तासाचा वेळ मिळेल.

गुगल सपोर्ट पेजनुसार मीट यूजर्सला ग्रुप व्हिडीओ कॉलिंगच्या दरम्यान 55 मिनिटानंतर एक नोटिफिकेशन मिळतो की तुमचा कॉल समाप्त होणार आहे.

कंपनीने अपडेटमध्ये म्हटले की कॉल वाढविण्यासाठी यूजर्स आपल्या गुगल अकाउंटला अपग-ेड करु शकतात. नाही तर कॉल 60 मिनिटानंतर समाप्त होईल.

वन ऑन वन कॉलवर 24 तासा पर्यंत आणि तीन किंवा त्यापेक्षा अधिक लोकां बरोबर 60 मिनिटा पर्यंत कॉल उपलब्ध असेल. मात्र गुगल वर्क प्लेसच्या व्यक्तीगत सदस्याला 24 तासासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक लोकां बरोबर समोरा समोर कॉल आणि ग्रुप कॉल करु शकतात.

गुगलने मागील वर्षी घोषणा केली होती की गुगल अकाउंट असलेल्या कोणताही व्यक्ती  महामारीच्या काळात विना कोणत्याही कालमर्यादेचे 100 लोकां बरोबर फ्रि मीटिंग करु शकत होता. गुगलने मागील महिन्यात घोषणा केली होती की त्यांची एकीकृत संचार आणि सहयोग सेवा कार्यस्थळा आता गुगल खाते असलेल्या सर्व लोकांसाठी उपलब्ध आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!