यूपी ब्लॉक प्रमुख निवडणुकीत झालेल्या हिंसेवर प्रियंका गांधी यांचा हल्ला, 4 प्रश्नाद्वारे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली प्रतिनिधी
12 जूलै
उत्तरप्रदेशात झालेल्या ब्लॉक प्रमुख निवडणुकचे परिणाम समोर आले आहे. तेथे निवडणुकीदरम्यान झालेल्या हिसेंच्या घटनेवर काँग्रेस सरचिटणीस आणि यूपी प्रभारी प्रियंका गांधी यांनी ब्लॉक प्रमुख निवडणुकीत झालेल्या हिंसेवर फेसबुक पोस्टवर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आणि पंतप्रधान मोदींवर हल्ला केला तसेच झालेल्या हिंसेवर 4 प्रश्नाद्वारे सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केला आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर प्रियंका गांधी यांनी लिहले की, सध्या आताच उत्तरप्रदेशात संपन्न झालेले ब्लॉक प्रमुख अध्यक्षांच्या निवडणुकीत भारी- भक्कम हिंसेनंतर भाजपाच्या विजयावर पंतप्रधान, गृह मंत्री व यूपीचे मुख्यमंत्रीसहित सर्व लोकांनी आपल्या धोरणाच्या यशाचे कसीदे वाचावे.
तसेच, पंतप्रधानांसहित पूर्ण भाजपाने भाजपा कार्यकर्ते, नेते व आमदार-खासदारांद्वारे या निवडणुकीत केलेली हिंसा व गुंडागर्दीवर मौन ठेवले. तसेच भाजपाद्वारे केलेली हिंसा व गुंडागर्दीला पूर्ण प्रदेशाच्या जनतेने पाहिले आणि त्यावर नाराजी देखील प्रकट केली.
याच्या व्यतिरिक्त प्रियंका गांधी यांनी निवडणुकदरम्यान विभिन्न ठिकाणी झालेल्या हिंसेला मोजवले. तसेच प्रियंका गांधी यांनी हिंसेवर प्रश्न विचारून सांगितले की शुभेच्छा देणारे पंतप्रधानांना माहित नव्हते की त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याप्रकारे महिलांच्या साड्या ओढल्या आणि त्यांच्याशी मारहाण, धक्का बुक्की केली का?
बॉम्ब, गोळी आणि दगड चालवणारे भाजपाई कारनामे पंतप्रधान जी, मुख्यमंत्री जी यांच्या देखरेखीत झाले का? तसेच पोलिस प्रशासनाला मार खालल्यानंतर देखील शांत राहण्यास सांगितले होते आणि प्रशासनाला स्पष्ट इशारा होता की सर्व काही पाहून डोळे बंद करायला पाहिजे का?
प्रियंका यांनी अंतिम प्रश्न विचारून लिहले की भाजपालला माहित झाले की त्यांच्या अंतिम दिवस आता जवळ आहे, यामुळे भारी हिंसेद्वारे लोकशाहीच्या चीरहरणमध्ये व्यस्त आहे का?
त्यांनी लिहले की ज्या निवडणुकच्या विजयावर पंतप्रधान, मुख्यमंत्रींना सर्व शुभेच्छा देत आहे, त्यात भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी कमीत कमी 50 पेक्षा जास्त ठिकाणी जबरदस्त हिंसा केली. कायदा व प्रशासन मूकदर्शक बनून राहिले किंवा त्याला वरून ऑर्डर देऊन शांत केले गेले.
पंतप्रधान, उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्रीसहित सर्वांना माहित आहे की उत्तरप्रदेश भाजपा सरकारचे जनविरोधी धोरणामुळे जनतेत जास्त नाराजी आहे. आता त्यांनी अपहरण, गोळीबार, बमबाजी, पोलिसांसोबत मारहाण करून, सत्तेचा दुरूपयोग, महिलांशी गैरवर्तन करण्याद्वारे आपली विफळता लपवण्याचा प्रयत्न केला आहे.