टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी भारतीय पथकाच्या तयारी / सहभागाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची बैठक

नवी दिल्ली, 12 जुलै 2021

टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी भारतीय पथकाच्या तयारी /सहभागाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची सातवी बैठक आज नवी दिल्लीत झाली.केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री निसीथ प्रामाणिक या बैठकीला उपस्थित होते. 

टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सुविधा यासह विविध पैलूंबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

#Cheer4India अभियान आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय चमुला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला संध्याकाळी 5 वाजता त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यासाठीच्या तयारीबाबतही अनुराग ठाकूर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दूरदर्शन आणि विविध सरकारी सोशल मिडिया प्लाटफॉर्मवर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!