केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 36 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे केले उद्‌घाटन

नवी दिल्ली, 12 जुलै 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 36 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन केले. जगन्नाथ रथ यात्रेच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना शुभेच्छा देताना अमित शहा म्हणाले की ते अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून ते प्रार्थनांमध्ये भाग घेत आले आहेत आणि प्रत्येक वेळी येथे एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. “मला आजही महाप्रभूंची पूजा  करण्याचा बहुमान मिळाला आहे.”  भगवान जगन्नाथ यांची कृपा आणि आशिर्वाद नेहमीच सर्वावर राहोत अशी सदिच्छा अमित शहा यांनी व्यक्त केली.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील नारदीपूर  गावात 25 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्‌घाटन केले तसेच स्वामीनारायण मंदिर, अदालाज यांच्यामार्फत नव्याने बांधलेल्या शारदामणी समुदाय केंद्राचे उद्‌घाटनही केले. मी अशा गावात आलो आहे जिथे लोकांनी अशी व्यवस्था केली आहे की कोणी उपाशी झोपू नये. अशी व्यवस्था केली गेली आहे की केवळ लोकच नाही तर कोणतेही प्राणी उपाशीपोटी झोपणार नाहीत, असेही शहा यावेळी म्हणाले.

गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड-19 विरुद्ध लढाईत विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांना राजभवन येथे प्रशस्तीपत्रे दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!