शेतकरी सहकारी संस्था आणि एफपीओचे निर्यात संबंध मजबूत करण्यासाठी अपेडाने नाफेडबरोबर सामंजस्य करार केला

नवी दिल्ली 12 JUL 2021 

सहकारी आणि शेतकरी उत्पादक संघटनाच्या (एफपीओ) कृषी व प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यात क्षमतेचा लाभ घेण्यासाठी कृषी व प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा ) ने आज भारतीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड (नाफेड) बरोबर सामंजस्य करार केला आहे.

या सामंजस्य करारानुसार, सहकार्याच्या ्महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अपेडा नोंदणीकृत निर्यातदारांना नाफेड मार्फत राबविल्या जाणार्‍या केंद्र सरकारच्या सर्व योजनाअंतर्गत मदत मिळणे समाविष्ट आहे. तंत्रज्ञान, कौशल्य, दर्जेदार उत्पादने आणि बाजारपेठ प्रवेश यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष देऊन सहकारी संस्थांच्या निर्यातीची शाश्वती आणि वृद्धी सुनिश्चित करण्याबाबतचे तपशील सामंजस्य करारात नमूद केले आहेत.

वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एपीईडीए (अपेडा) आणि बहु राज्यीय सहकारी संस्था कायदा अंतर्गत नोंदणीकृत नाफेड मधील सहकार्य कृषी उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कृषी उत्पादनात सहभागी असलेल्या सहकारी संस्थांना तसेच शेतकऱ्यांना शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी मदत करेल. 

अपेडा सहकारी संस्था , एफपीओ, भागीदार आणि नाफेड द्वारा प्रोत्साहित निवडक सहयोगी संस्थांद्वारे निर्यात सुलभ करेल.

अपेडा आणि नाफेड भारतात आणि परदेशात आयोजित करण्यात येणाऱ्या B2B आणि B2C मेळाव्यांसह जागतिक व्यापारात शेतकरी सहकारी संस्थांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विकास आणि प्रोत्साहनात परस्पर सहकार्य करण्यास देखील मदत करेल.

या सामंजस्य करारात सहकारी संस्था, बचतगटांच्या क्षमता वाढीसाठी सामाजिक आणि पर्यावरणीय अनुपालन आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कौशल्य यासाठी मदत पुरवणे देखील समाविष्ट आहे. दोन्ही संघटना प्रादेशिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जागरूकता कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करतील .

अपेडा आणि नाफेड यांनी कृषि निर्यात धोरणांतर्गत अधिसूचित केलेल्या विविध राज्यांमधील क्लस्टर्सच्या शाश्वत समूह विकासासाठी समन्वयाने काम करण्याबाबत सहमती दर्शवली आहे.

अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. आंगमुथु आणि नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चड्ढा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. हितधारकांना अधिक चांगले मूल्य मिळवून देण्यासाठी कृषी व त्यासंबंधित क्षेत्राच्या हितासाठी एकत्रितपणे काम करून दोन्ही संघटनांचे कौशल्य वापरण्यासाठी हा सामंजस्य करार झाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!