उपराष्ट्रपतींकडून रथ यात्रेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा
नवी दिल्ली 11 JUL 2021
उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी नागरिकांना रथ यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात-
“रथयात्रेच्या मंगल प्रसंगी सर्व नागरिकांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा.
ओदिशाच्या पुरी येथील भगवान जगन्नाथ यांची पारंपरिक रथयात्रा स्थानिक आणि संपूर्ण देशातील श्रद्धाळूंसाठी बहुप्रतिक्षीत क्षण आहे. रथयात्रा आपल्या वैविध्यपूर्ण आणि समावेशी संस्कृतीचे प्रतीक आहे आणि भगवान जगन्नाथ भक्तांसाठी याचे अध्यात्मिक महत्त्व आहे.
भगवान जगन्नाथ, बलराम जी तसेच सुभद्रा जी यांचे भव्य रथ दिव्यतेचे प्रतीक आहेत.
यावर्षीसुद्धा भारत आणि जग कोविड-19 च्या अभूतपूर्व संकटाला सामोरे जात आहे. म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, कोविड सुरक्षेच्या नियमांचे पालन करत रथयात्रा उत्सव अतिशय काळजीपूर्वक साजरा करावा.
रथयात्रेच्या पवित्र आणि महान आदर्शाने आपले जीवन शांती, सद्भाव, आरोग्य आणि आनंदाने समृद्ध करु दे.”