केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गांधीनगरमध्ये 448 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
नवी दिल्ली 11 JUL 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज त्यांच्या गांधीनगर या लोकसभा मतदारसंघात 448 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सुरू असलेल्या विकास मोहिमेतील आजचा एक महत्त्वाचा दिवस असल्याबद्दल आपल्याला अत्यंत आनंद झाला आहे. ते म्हणाले की, आज हा मोठा आनंददायी कार्यक्रम असून एकूण 267 कोटी रुपयांची विकासकामे सुरू होणार आहेत.
अमित शाह यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेमार्फत 29 कोटी रुपये खर्च करून आधुनिकीकरण आणि नूतनीकरणाची कामे करण्यात आली आहेत. अहमदाबाद रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण 17 कोटी रुपये खर्चून करण्यात आले आहे.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात आपण कोविड -19 महामारीचा दृढतेने सामना करत आहोत. यामध्ये पहिल्या आणि दुसर्या लाटेविरुद्धच्या लढ्याचा समावेश आहे. या लढ्याच्या माध्यमातून कोरोना विरोधातील संरक्षक ढाल निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे. ते म्हणाले की, जेंव्हा सर्व नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन स्वत: ला सुरक्षित करतील तेंव्हाच संपूर्ण सुरक्षा प्राप्त होईल.