भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे माल वाहतुकीला मिळाली मोठी चालना

नवी दिल्ली, 9 जुलै 2021

भारत आणि नेपाळ दरम्यानची द्विपक्षीय मालवाहतूक असो किंवा भारतीय बंदरातून नेपाळला जाणारी तिसऱ्या देशातील मालवाहतूक असो सर्व मालगाडी चालकांना भारतीय रेल्वे मार्गांचा वापर करण्याची अधिकृत परवानगी मिळाल्यामुळे आज भारत आणि नेपाळ दरम्यान रेल्वे माल वाहतुकीला मोठी चालना मिळाली. या उदारीकरणामुळे नेपाळमधील रेल्वे मालवाहतूक क्षेत्रात बाजारातील मागणी पुरवठा करणारे घटक पुढे येतील आणि यामुळे कार्यक्षमता आणि खर्चातील स्पर्धात्मकता वाढू शकेल परिणामस्वरूप नेपाळी ग्राहकांना फायदा होईल.

या मालवाहू गाडी चालकांमध्ये सार्वजनिक आणि खासगी कंटेनर रेल्वे चालक, ऑटोमोबाईल मालवाहू रेल्वे चालक, विशेष मालवाहू रेल्वे चालक किंवा भारतीय रेल्वेने प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही चालकाचा समावेश असेल.

भारत व नेपाळच्या अधिकाऱ्यांमधील देवाणघेवाण पत्राच्या साक्षांकित प्रति आणि नोट व्हर्बलच्या औपचारिक आदानप्रदानानंतर 09.07.2021 पासून हे लागू झाले.

या पत्राच्या देवघेवीनंतर एलओई नंतर, भारतातील भारतीय रेल्वे मार्गावर माल वाहून नेणार्‍या सर्व प्रकारच्या वॅगन आता नेपाळमध्येही मालाची ने आण करू शकतात.

या निर्णयामुळे वॅगनद्वारे वाहतूक होणाऱ्या ऑटोमोबाईल आणि इतर काही उत्पादनांसाठीचा वाहतूक खर्च कमी होईल.

नेपाळ रेल्वे कंपनीच्या मालकीच्या वॅगन्सला भारतीय रेल्वेच्या मानकानुसार व कार्यपद्धतीनुसार नेपाळला जाणारी मालवाहतूक (कोलकाता / हल्दिया ते विराटनगर / बीरगंज मार्गांवरील अंतर्गत आणि परदेशी) भारतीय रेल्वे मार्गावर नेण्यासाठीही अधिकृत केले जाईल.

या देवाणघेवाण पत्रावर स्वाक्षरी केल्याने “नेबरहुड फर्स्ट” अर्थात शेजारधर्माला प्राधान्य धोरणांतर्गत प्रादेशिक संपर्क वाढविण्याच्या भारताच्या प्रयत्नांमधील हा आणखी एक मैलाचा टप्पा आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!