पंचायती राज मंत्रालयाने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त सर्व 225 आदर्श पंचायतसाठी मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2021

पंचायती राज मंत्रालयाने आझादी का अमृत महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या सर्व 225 आदर्श पंचायतसाठी आझादी का अमृत महोत्सव (India@75) याबाबत मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ.चंद्रशेखर कुमार होते तर संचलन पंचायती राज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार डॉ. विजय कुमार बेहरा यांनी केले. या कार्यक्रमात पंचायती राज मंत्रालयाचे सहसचिव, राज्य/केंद्रशासित प्रदेशच्या पंचायती राज विभागांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था व पंचायती राज, ग्रामीण विकास व पंचायती राज राज्य संस्थेचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ चंद्रशेखर कुमार, म्हणाले की ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आदर्श पंचायती  महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यांनी आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि उपस्थितांना सांगितले की जनसंवाद आणि जन-जागरण सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून जन-भागीदारीच्या भावनेने आझादी का अमृत महोत्सव हा एक जन-उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी देशभरातील पंचायत राजचे राज्य/केंद्रशासित प्रदेश विभाग आणि पंचायती राज संस्थांकडून विविध स्मृतीपर उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

या संदर्भात त्यांनी आदर्श पंचायतींना समर्पक पद्धतीने आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

स्वातंत्र्य दिनासह विविध उपक्रम मोठ्या संख्येने व उत्साहाने साजरा करण्यासाठी त्यांनी आदर्श पंचायतीना आणि पंचायतीच्या राज्य/केंद्र शासित प्रदेश विभाग आणि एसआयआरडी व पीआर यांना भारतीय संविधानाच्या अकराव्या सूचीत नमूद केलेले 29 विषय, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सच्या माध्यमातून व्यापक प्रसार करण्यासाठी पीआरआयच्या महत्वपूर्ण भूमिकेसह शाश्वत  विकास उद्दिष्ट (एसडीजी) अंतर्गत सहा प्रमुख उद्दिष्टांचे स्थानिकीकरण यासारख्या विषयांवर आठवडा -निहाय पत्रक तयार करुन आणण्याची सूचना केली आहे. 

त्यानंतर पंचायत राज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार डॉ. विजय कुमार बेहरा, यांनी आझादी का अमृत महोत्सव (India@75) च्या उत्सवात आदर्श पंचायतींची भूमिका/ आदर्श पंचायती निवडण्यामागचा उद्देश तसेच आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आणि आदर्श  पंचायतींकडून असलेल्या अपेक्षांनुसार आठवडाभर  राबवले जाणारे उपक्रम याबाबत थोडक्यात सादरीकरण केले.

मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रमात पंचायती राज संस्थांच्या भविष्यवादी भूमिकेविषयी सविस्तर सादरीकरण   हैदराबादच्या पंचायती राज विकेंद्रित नियोजन व समाज सेवा वितरण केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ अंजन कुमार भांजा यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!