न्याय विभागाने आपल्या टेली -लॉ कार्यक्रमांतर्गत 9 लाख लाभार्थ्यांचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला. टेली -लॉ मध्ये न्यायदान प्रक्रिया सर्वसमावेशक करण्याची आणि कायद्याचे शासन मजबूत करण्याची क्षमता आहे- कायदा मंत्री रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली, 6 जुलै 2021

टेली -लॉ  कार्यक्रमांतर्गत 9 लाख लाभार्थ्यांचा महत्वपूर्ण टप्पा साजरा करण्यासाठी आणि  “आझादी का अमृत महोत्सव” चा प्रारंभ करण्यासाठी  न्याय विभागाने आज नवी दिल्लीत  एक कार्यक्रम आयोजित केला.

या वेळी बोलताना कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी  सामान्य नागरिकांच्या दैनंदिन सामाजिक समस्या / संघर्षाचे निराकरण करण्यासाठी  आणि त्यांच्यासाठी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यात जनतेला मदत करण्यासाठी आधारस्तंभ बनलेल्या  व्हीएलई, पीएलव्ही, राज्य समन्वयक आणि पॅनेल वकिलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले .

टेली -लॉ  उपक्रमाच्या वेगवान विस्ताराबाबत  मित्रा म्हणाले, “टेलि-लॉ ने  2017 मध्ये 1800  सीएससीच्या माध्यमातून  11 राज्यातील  170 जिल्ह्यांमधून आपला प्रवास सुरु केला. 2019 मध्ये, सीएससींची संख्या  29,860 पर्यंत नेताना 115 महत्वाकांक्षी  जिल्हे जोडले गेले. न्याय विभागाला अभिमान आहे की आज 50,000  सीएससी व्यापलेल्या 34 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील 633 जिल्ह्यात टेली -लॉ  कार्यरत आहे. ”

ते पुढे म्हणाले की, गेल्या एका वर्षात टेली -लॉ ने लाभार्थींच्या संख्येत 369% वाढ नोंदवली. कोविड महामारी दरम्यान सामान्य नागरिकांनी त्यांचे हक्क आणि अधिकार सांगण्यासाठी हे माध्यम व्यापकपणे वापरले. आम्ही जून 2021 मध्ये एक नवीन मैलाचा दगड गाठला असून टेली -लॉ द्वारे 9.5 लाखाहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे.

या कार्यक्रमात देशातील पाच विभागांमध्ये विविध श्रेणी अंतर्गत  सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या  20  पदाधिकाऱ्यांचा  सत्कार देखील करण्यात आला. श्रेणी निहाय तपशील खालीलप्रमाणे आहेतः

ग्रामस्तरीय उद्योजक श्रेणीत विजय मोहन कसबे , पॅरा-लीगल व्हॉलंटिअर श्रेणीत वैजयंती कलप्पा बोनगारगे, राज्य समन्वयक गटात योगेश निकम, पॅनल वकीलांमध्ये श्वेतांजली मिश्रा या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

श्वेतांजली मिश्रा (पॅनेल वकिल) महाराष्ट्र – त्या 2019 पासून यात सहभागी आहेत आणि लाभार्थ्यांना 30,000 पेक्षा अधिक सल्ले मिळवून दिले असून  ‘लाभार्थ्यांचा आवाज ‘  मध्ये त्यांच्या 34 यशोगाथा निवडण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!