स्वर्णिम विजय वर्ष सोहळ्यानिमित्त लष्कराच्या वतीने ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नवी दिल्ली, 6 जुलै 2021
भारत-पाकिस्तान यांच्यात 1971 मधे झालेल्या युद्धातील विजयाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने स्वर्णिम विजय वर्ष सोहळा साजरा होत आहे. या अनुषंगाने भारतीय लष्कराने 1 जुलै ते 3 ऑगस्ट 2021 याकाळात ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. देशातील सर्व नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली असून, आपल्या प्रवेशिका swarnimvijayvarsh.adgpi@gmail.com या इमेलवर पाठवता येतील. इतर तपशील भारतीय सैन्याच्या फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर उपलब्ध आहे.
निवड झालेल्या चित्रांचा उपयोग भारतीय सैन्याच्या अधिकृत माध्यम स्रोतांवर केला जाईल. या विजेत्यांना श्रेयनामासह रोख रक्कमेचे बक्षिसही दिले जाईल. चित्रकला स्पर्धेसह अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, याबाबतची तपशीलवार माहिती वेळोवेळी भारतीय सैन्याद्वारे मुद्रीत आणि समाजमाध्यमांवर दिली जाणार आहे.
नागरीकांबरोबर जवळचे नाते निर्माण करणे आणि 1971 च्या मुक्ती संग्रामातील भारतीय सैन्याच्या अतुलनीय योगदानाच्या आठवणींना उजाळा देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.