भारतीय आतिथ्य आणि पर्यटन उद्योग मजबूत करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने YATRA.COM बरोबर केला सामंजस्य करार

नवी दिल्ली 05 JUL 2021 

पर्यटन मंत्रालयाने, आतिथ्य व पर्यटन उद्योग मजबूत करण्यासाठी  2 जुलै 2021 रोजी Yatra.com बरोबर सामंजस्य करारावर (एमओयू)  स्वाक्षरी केली. भारतीय आतिथ्य आणि पर्यटन उद्योग मजबूत करण्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी पर्यटन मंत्रालय आणि गुणवत्ता परिषद (क्यूसीआय) मधील व्यवस्थेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट  ओटीए प्लॅटफॉर्मवर (आतिथ्य  उद्योगासाठी मूल्यांकन  जागरूकता आणि प्रशिक्षण प्रणाली) साथी वर स्वयं  प्रमाणित केलेल्या निवास स्थानांना व्यापक प्रसिद्धी देणे हा आहे. निवास स्थानांना निधी वर आणि साथी वर नोंदणी करण्यासाठी  तसेच कोविडचा  प्रसार रोखण्यासाठी स्थानिक पर्यटन उद्योगाला प्रोत्साहित करण्याबाबत या  सामंजस्य करारात नमूद केले आहे. कार्यवाहीची माहिती मिळवण्यासाठी  तसेच पुरावा आधारित आणि लक्ष्यित धोरणात्मक उपाय, सुरक्षित, सन्माननीय आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा  युनिट्सबद्दल अधिक माहिती गोळा करणे ही कल्पना यामागे  आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!