फास्टॅगद्वारे दैनिक पथकर संकलन हे कोविड महामारीच्या दुसर्‍या लाटेपुर्वीच्या विक्रमी स्तरावर

नवी दिल्ली 02 JUL 2021 

देशातील बहुतांश राज्यांत लॉकडाऊन शिथिल झाल्याने आणि महामार्गांवरील वाहतुकीत वाढ झाल्याने फास्टॅगमार्फत पथकर संकलन कोविड महामारीच्या  दुसर्‍या लाटेपुर्वी असलेल्या विक्रमी स्तरावर पोहोचले आहे. फास्टॅगच्या माध्यमातून देशभरातील पथकर  संकलन  01 जुलै 2021 रोजी झालेल्या 63.09 लाख रुपयांच्या व्यवहारांसह 103.54 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. फास्टॅगच्या  माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पथकर संकलन देशभरात 780 सक्रिय पथकर नाक्यांवर कार्यान्वित आहे.

जून 2021 मध्ये पथकर संकलन वाढून 2,576.28 कोटी रुपये झाले असून ते  मे 2021 मध्ये जमा  झालेल्या 2,125.16 कोटी रुपये पथकर संकलनापेक्षा सुमारे  21 टक्क्यांनी अधिक आहे.सुमारे 3.48 कोटी वापरकर्त्यांसह, देशभरात फास्टॅग वापर सुमारे 96 टक्के आहे आणि बर्‍याच पथकर नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून  99%   प्रवेश आहे. एका अंदाजानुसार, फास्टॅगमुळे इंधनावर वर्षाकाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांची बचत होईल, त्यामुळे परकीय चलनाची बचत होऊन पर्यावरण समतोल राखण्यासही मदत होईल.

महामार्ग वापरकर्त्यांद्वारे, फास्टॅगच्या  वापरात सतत वाढ आणि स्वीकारार्हतेमुळे  राष्ट्रीय महामार्गांवरील पथकर नाक्यांवरील  वाहनांचा प्रतीक्षा वेळ कमी झाला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!