किरकोळ व घाऊक व्यापार उद्योगांना एमएसएमईमधे समाविष्ट करण्याची सरकारने केली घोषणा
नवी दिल्ली 02 JUL 2021
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज, एमएसएमईमधे किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांना समाविष्ट करुन त्यांच्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे असे म्हटले आहे, की पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाअंतर्गत आम्ही एमएसएमईंचे सबलीकरण करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक विकासाचे गतीमान इंजिन बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. श्री. गडकरी पुढे म्हणाले की, या सुधारित मार्गदर्शक सूचनांचा लाभ अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना होईल. ते म्हणाले की, किरकोळ आणि घाऊक व्यापारउद्योग एमएसएमईच्या कक्षेबाहेर येत असत, परंतु आता सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्याने कर्ज मिळवण्याचा लाभ घेता येईल.
या सुधारित मार्गदर्शक सूचनांद्वारे आता किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांना उद्यम नोंदणी पोर्टलवर नोंदणी करण्याची परवानगी दिली जाईल.