राजधानीत सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन साजरा

नवी दिल्ली, 31 :

देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त  श्याममलाल गोयल यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवास आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त  डॉ. राजेश आ आडपावार  यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

            सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त  श्री. गोयल यांनी उपस्थित अधिकारी – कर्मचा-यांना  राष्ट्राची एकात्मकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!