सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत, आकाशवाणीच्या सरदार पटेल स्मृती व्याख्यान 2021 चे प्रमुख वक्ते
नवी दिल्ली,
आकाशवाणीतर्फे दरवर्षी घेतल्या जाणार्या, प्रतिष्ठित, सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत यंदा भारताचे सैन्यदल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांना मुख्य वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
सीडीएस जनरल बिपीन रावत ’राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्यदलांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 31 ऑॅक्टोबर रोजी या व्याख्यानाचे प्रक्षेपण संध्याकाळी 9.30 वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन केले जाणार आहे. तसेच त्याच दिवशी संध्याकाळी दहा वाजता हे व्याख्यान दूरदर्शनच्या डीडी नैशनल या वहिनीवरुनही प्रसारित केले जाईल.
1955 पासून आकाशवाणी तर्फे सरदार पटेल व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. या व्याख्यानमालेत दरवर्षी अनेक सुप्रसिद्ध नेते,विचारवंत आणि मान्यवर भाष्यकारांनी आमंत्रित प्रेक्षकांसमोर विविध विषयांवर आपली मते मांडतात, त्यानंतर त्याचे आकाशवाणी वाहिन्यांवरुन प्रक्षेपण केले जाते.
1955 पासून आजवर या व्याख्यानमालेत झालेल्या सर्व भाषणांचे संकलन प्रसारभारतीच्या आर्कईव्हस यू ट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. या सर्व व्याख्यानांची लिंक खाली दिलेली आहे.