गुगलने डूडलसह जुडोचे संस्थापकाची जयंती साजरी केली
नवी दिल्ली,
जगविख्यात जुडो क्रीडचा निर्मिता असलेले जपानी कानो जिगोरोंच्या 161 व्या जयंती निमित्ताने गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून त्यांची जयंती साजरी करत आठवणीना उजाळा दिला.
गुगलने डूडलच्या अनेक स्लाइडसच्या माध्यमातून जिगोरोशी संबंधीत माहिती दाखवली आहे. जिगोरोचा जन्म 28ऑक्टोबर 1860 ला झाला होता. त्यानी विविध मार्शल आर्ट तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आणि जूडोची स्थापना केली.
अॅनिमेटेड डूडलमध्ये जिगोरोला जूडोच्या विविध थ-ो आणि तंत्रज्ञानासह विकसीत करत आणि अन्य शिष्याना याला दाखविण्यासाठी शाळेची स्थापना करताना दर्शविले गेले आहे.
एक जपानी शिक्षक आणि अॅथलीट जिगोरोचे 1938 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले होते. त्यांनी एका नवीन खेळाला बनविण्यासाठी पारंपारीकपणे संशोधीत करत जूडोच्या आधुनिक रुपाची स्थापना केली. जूडो व्यापक आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त करणारा पहिला जपानी मार्शल आर्ट होता आणि अधिकृतपणे ऑलम्पिक क्रीडा प्रकार बनणारा पहिला खेळ होता.
जिगोरोनी ब्लॅक अँड व्हाईट बेल्टचा उपयोगाचा आविष्कार केला आणि मार्शल आर्ट शैलीच्या सदस्यांमध्ये सापेक्ष रॅकिंग दाखविण्यासाठी डॅन रॅकिंगची सुरुवात केली.
कानोंसाठी प्रसिध्द आदर्श वाक्यांमध्ये न्यूनतम प्रयत्नासह अधिकतम दक्षता आणि आपसी कल्याण आणि लाभ सामिल आहे.
एक शिक्षक असण्या व्यतिरीक्त जिगोरो एक खेळ प्रशासंकही होते आणि ऑलम्पिक खेळाचे आयोजन करणारी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचा भाग बनणारे पहिले आशियीई होते.